गोपनीयपने पोलीस ठाण्यातील छायाचित्रण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : उपळा (मा.) येथील महेबुब ईलाही शेख यांच्या सांगण्यावरुन गावकरी- राहुल रणजित रोडे यांने दि. 18 ऑगस्ट रोजी 19.30 ते 20.00 वा. दरम्यान आनंदनगर पोलीस ठाण्यात विनाकारण येउन पोलीसांचे व अंतर्गत भागाचे गोपनीयरित्या छायाचित्रण करुन पोलीसांच्या गोपनीयतेचा भंग केला. यावरुन सपोनि- श्री. भारत बलैय्या यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शासकीय गुपीते अधिनियम कलम- 3 व म.पो.का. कलम- 120 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी 

 प्रादेशीक परिवहन कार्यालयासमोरील ‘मैत्री ऑनलाईन सर्विस सेंटर’ चा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 17- 18 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री उचकटून आतील एलजी कंपनीचा संगणक व 15,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेबुब शेख, रा. उपळे (मा.) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

आंबी  : नाना डोके, रा. रोहकल, ता. परंडा यांच्या शेळ्या दि. 15 ऑगस्ट रोजी 10.00 वा. सु. शेजारचे शेतकरी- सतीष शिंदे यांच्या ऊसात गेल्या. यावर शिंदे यांनी चिडून डोके यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच डोके यांच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून त्याच कुऱ्हाडीने डोके यांच्यावर वार केला असता डोके यांच्या उजव्या हाताची करंगळी तुटून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या डोके यांनी दि. 18 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web