उस्मानाबादेत अवैध सावकारी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

 
उस्मानाबादेत अवैध सावकारी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद -  भुजंग गुंडू शेट्टी, रा. समतानगर, उस्मानाबाद यांनी सन- 2007 मध्ये 1,00,000 ₹ रकमेचा धनादेश गावकरी- कडाप्पा कोंडीबा गाडे यांना देउन त्यांच्याकडून 1,00,000 ₹ कर्ज घेतले होते. 

शेट्टी यांनी कर्जफेड केल्यानंतर तो धनादेश व संबंधीत कागदपत्रे शेट्टी यांना परत केले. असे शेट्टी यांच्या तक्रार अर्जावरील चौकशीत निष्पन्न झाले आहे. अशा मजकुराच्या आशाबाई कांबळे, लिपीक-सहकार कार्यालय, यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायदा कलम- 39 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 परंडा: बाळु अभिमान शिंदे, वय 34 वर्षे, रा. वडनेर, ता. परंडा हे व्यक्तीगत बंधपत्रावर न्यायालयातून जामीन मुक्त झाले होते. परंतु ते न्यायालयीन सुनावनीस वेळोवेळी गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुध्द सम्नस व त्यानंतर वॉरन्ट काढले होते. अशा प्रकारे त्यांनी जाणीवपुर्वक न्यायालयात गैरहजर राहुन भा.दं.सं. कलम- 229 (अ) चे उल्लंघन केले. यावरुन पोना- विशाल खोसे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो.ठा. येथे 30 मार्च रोजी गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाया

 मुरुम: काशिनाथ शंकर कांबळे, रा. मुरुम, ता. उमरगा हे 30 मार्च रोजी भीमनगर, मुरुम येथे 10 लि. गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

 लोहारा: श्रीराम चंद्रकांत सुर्यवंशी, रा. धानुरी, ता. लोहारा हे 30 मार्च रोजी धानुरी येथील चौकालगत देशी दारुच्या 10 बाटल्या अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web