तुळजापुरात जनावरांची निर्दयीपणे वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

तुळजापूर  : सरफराज अक्तर पठाण, रा. उस्मानाबाद हे दि. 30.08.2021 रोजी 13.30 वा. सु. सिंदफळ शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर ॲपे मॅजीक क्र. एम.एच. 13 एएन 5963 मध्ये दाटीवाटीने जनावरे भरुन त्यांच्या चारापाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयतेने वाहतुक करत असतांना तुळजापूर पो.ठा. पथकास आढळले. यावरुन तुळजापूर पो.ठा. चे पोलीस नाईक- दिलीप राठोड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन प्राण्यांना क्रुरतेने वागणुकीस प्रतिबंध कायदा कलम- 11 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

शिराढोण : चालक- योगेश जनार्धन खोसे, रा माटेफळ, ता. लातूर यांनी दि. 31.08.2021 रोजी 16.00 वा. सु. निपाणी गावातील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 24 बीसी 8285 ही निष्काळजीपने चालवल्याने मो.सा. वर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या आई- मैनाबाई जनार्धन खोसे, वय 60 वर्षे या खालीपडून गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या सतीश जनार्धन खोसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय माहितीवरुन शिराढोन पो.ठा. च्या पथकाने दि. 31 ऑगस्ट रोजी भाटशिरपुरा गावात चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात भाटशिरपुरा ग्रामस्थ- महादेव जाधव हे आपल्या घरासमोर देशी- विदेशी दारुच्या 5 बाटल्या बाळगलेले तर विलास शिंदे हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 6 बाटल्या बाळगलेले तर अमिनाबाई पवार या त्यांच्या घरासमोर 5 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर बाबासाहेब घाडगे हे गावातील त्यांच्या हॉटेलजवळ देशी दारुच्या 6 बाटल्या बाळगले असतांना पथकास आढळले. तसेच शशीकांत तांबे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर हे दि. 30 ऑगस्ट रोजी भातंब्री (घाट) येथे देशी- विदेशी दारुच्या 40 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.  यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे नोंदवले आहेत.

From around the web