तामलवाडी येथे नवीन एमआयडीसी साठी प्रयत्नशील - आ. राणाजगजितसिंह पाटील
तामलवाडी - देशातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, आत्मनिर्भर व्हावं या संकल्पनेतून मोदीजी काम करत असून जगात देशाची उंची वाढवण्याचे कार्य ते करत आहेत. अविरत काम करण्याची मोदीजीं ची कार्यशैली आजवरच्या इतर पंतप्रधानांपेक्षा वेगळी असून तीन दिवसाच्या परदेश दौऱ्यात २५ कार्यक्रम घेऊन आपली कार्यप्रणाली सिद्ध करणारे मोदी जी खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत. कोविड संकटानंतर आलेले संकट समर्थपणे पेलवत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी अभिनव योजना सुरु केल्या. या भागातील युवकांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तामलवाडी येथे नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काटगाव तालुका तुळजापूर येथे भाजपा आपल्या गावी या कार्यक्रमात बोलताना केले.
आत्मनिर्भर शब्द उच्चारताच आपल्या मध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होते. या योजनेच्या माध्यमातून येथील युवक युवतींना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तामलवाडी येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर व परिसरातील अनेक उद्योजक येथे येण्यासाठी उत्सुक आहेत. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी या भागांमध्ये उद्योग आणायचे आहेत, रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आवश्यक असून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास यामध्ये सब का प्रयास आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या साथीने या भागाचा चेहरा मोहरा आपण आगामी काळात निश्चितच बदलू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुद्धीजीवी सेलचे सदस्य .दत्ता कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, .दीपक आलुरे, तालुकाध्यक्ष .संतोष बोबडे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत वडगावे,.यशवंत अण्णा लोंढे, ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, मजूर फेडरेशन चेअरमन .नारायण ननवरे, शिवाजी साठे, आनंद कंदले, .खंडू पावले,भिवाजी इंगोले, .अण्णा सरडे, नागनाथ कलसुरे, अशोक माळी,.बाबा बेटकर, गुणवंत कोनाळे.सुधाकर हजारे, यांच्यासह काटगाव परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.