उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी 23 कारवाया

 
Osmanabad police

उस्मानाबाद - जुगार विरोधी मोहिमेदरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल मंगळवार दि. 20 जुलै रोजी जिल्हाभरात जुगार विरोधी 23 कारवाया करुन कारवायांतील जुगार साहित्य व 19,170 ₹ रक्कम जप्त करुन संबंधीत पोलीस ठाण्यात 31 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत 23 गुन्हे नोंदवले आहेत.

1) जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने पो.ठा. हद्दीत सात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात 1)नागेश इटुबोने, रा. नाईचाकुर हे नाईचाकुर शिवारात 2) चंद्रकांत करबीरे, रा. आळंद, राज्य कर्नाटक हे कसगी येथे 3) ज्ञानेश्वर माने, रा. बेडगा हे जकेकुर येथे 4) शांतवीर स्वामी, रा. बीदर, राज्य कर्नाटक हे तलमोड शिवारात 5) सचिन बनसोडे 6) बशीर शेख, दोघे रा. उमरगा हे दोघे उमरगा येथील काळे कॉम्प्लेक्सजवळ 7) ईम्रान बागवान, रा. उमरगा हे कार्ले प्लॉट, उमरगा येथे 8) संतोष सोनटक्के 9) दत्तु मदने, दोघे रा. उमरगा हे मुन्सी प्लॉट, उमरगा येथे एकत्रीतपने कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 6,580 ₹ रोख रक्कम बाळगलेले पथकास आढळले.

2) 1)शंकर पाटळे, रा. वालवड, ता. भुम हे गावातील गनेगाव रस्त्यालगतच्या टपरीमध्ये तर 2)गणेश मुसळे, रा. शाळुगल्ली, भुम हे पाथ्रुड फाटा येथे एकत्रीतपने कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,170 ₹ रोख रक्कम बाळगलेले भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) सलीम बागवान, फिरोज शेख, कैफ मिर्झा, तीघे रा. कळंब हे जुनी दुध डेअरी, कळंब येथे चक्री ऑनलाईन जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम असे 24,050 ₹ किंमतीचे साहित्य बाळगलेले तर भाऊसाहेब गवळी, रा. सावरगाव (पु.), विक्रम घुले, दोघे रा. शिरपुरा, ता. केज हे दोघे कळंब परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 2,050 ₹ रोख रक्कम बाळगलेले कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) आझरोद्दीन शेख, रा. आंबेजवळगा, ता. उस्मानाबाद हे गावातील घाटांग्री रस्त्यालगत तर विशाल साठे, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद हे सारोळा शिवारात एकत्रीतपने कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 2,000 ₹ रोख रक्कम बाळगलेले उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

5) अशोक देशमुख, रा. ईट, ता. भुम हे पारगाव  बस थांबा परिसरातील पत्रा शेडमध्ये तर मल्हारी सावंत, अमोल डोके, विनोद शिंदे, तीघे रा. ईट व बापु चव्हाण, रा. पखरुड हे ईट शिवारात एकत्रीतपने कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 2,030 ₹ रोख रक्कम बाळगलेले वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

6) अनिल कसबे, रा. तेरखेडा, ता. वाशी हे गावातील रस्त्याकडेला कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 830 ₹ रोख रक्कम बाळगलेले येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.

7) ज्ञानेश्वर गुंड, रा. पाडोळी (आ.), ता. उस्मानाबाद हे गावातील पेट्रोलीयम विक्री केंद्रासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 590 ₹ रोख रक्कम बाळगलेले बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.

8) कसिम नदाफ, रा. केशेगाव, ता. तुळजापूर हे इटकळ शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 780 ₹ रोख रक्कम बाळगलेले नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

9) मछिंद्र रणखांब, रा. उस्मानाबाद हे शहरातील बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 830 ₹ रोख रक्कम बाळगलेले आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.

10) अलिम अरब, रा. परंडा हे परंडा येथील एका दुकानासमोर कल्याण मटका जुगार साहित्य व 350 ₹ रोख रक्कम बाळगलेले परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

11) सुरेश शिंदे, रा. खडकी, ता. तुळजापूर हे गावातील चौकात मुंबई मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 790 ₹ रोख रक्कम बाळगलेले तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले.

12) पिनु वाडेकर, रा. सोनारी हे गाव शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 450 ₹ रोख रक्कम बाळगलेले आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

13) युवराज इंगळे, रा. उस्मानाबाद हे उस्माना गाव शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 450 ₹ रोख रक्कम बाळगलेले आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web