कळंबमध्ये १६ किलो गांजा जप्त

 
Osmanabad police

कळंब : कळंब पो.ठा. हद्दीतील कळंब- ढोकी रस्त्याने क्रुझर वाहन क्र. एम.एच. 28 सी 2593 मधुन अवैध गांजा वाहतुक होनार असल्याची गोपनीय खबर कळंब पो.ठा. च्या पथकास दि. 13 ऑगस्ट रोजी मिळाली. यावर पथकाने तात्काळ कळंब- ढोकी रस्त्यावरील डिकसळ फाटा येथील केंब्रिज इंग्लिश शाळेसमोरील रस्त्यावर लक्ष केंद्रीत केले. 

दरम्यान 16.45 वा. सु. नमूद वाहन येताच पथकाने त्या वाहनाची तपासणी केली. यावेळी चालक- गणेश राम कांबळे, वय 21 वर्षे, रा. बाभळगाव नाका, लातूर हा एका पोत्यात गांजा या मादक वनस्पतीची वाळलेली पाने, फुले, देठ, बीया असा एकुण 16.5 कि.ग्रॅ. गांजा क्रुझरमधुन अवैधपने वाहुन नेत असल्याचे आढळले.

            यावरुन पोलीसांनी नमूद गांजा व वाहन जप्त केला असून कळंब पो.ठा. चे सपोनि- श्री. अतुल पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन एन.डी.पी.एस. कायदा कलम- 8, 20 अंतर्गत गुन्हा गणेश राम कांबळे विरुध्द नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल

उस्मानाबाद  1) विठ्ठल गायकवाड, रा. बसवकल्याण यांनी उमरगा येथील महामार्गावर दि. 13 ऑगस्ट रोजी 17.00 वा. सु. महिंद्रा मॅक्सीमो वाहन तर 2) बालाजी ढोणे, रा. धाकटेवाडी, ता. उमरगा या दोघांनी तलमोड येथील महामार्गावर रहदारीस धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपने भर रस्त्यात आपल्या चहाटपरीसमोर खुर्च्या लावून भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. तसेच 3)ज्ञानेश्वर सुर्यवंशी 4) विकास कांबळे, दोघे रा. उमरगा यांनी याच दिवशी 17.35 वा. सु. उमरगा येथील महामार्गालगत आपापल्या हातगाड्यावरील शेगडीत निष्काळजीपने, धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. 5) राम गाडे, रा. येडशी यांनी 12.00 वा. सु. येडशी टोलनाक्याजवळील आपल्या हॉटेल येथे निष्काळजीपने, हयगईने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद पाच जणांविरुध्द उमरगा पो.ठा. येथे 4 व उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे 1 गुन्हा नोंदवला आहे.

From around the web