गोंधळी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश...
उस्मानाबाद - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरीत होऊन, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण, पर्यटक व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मंत्री आ. तानाजीराव सावंत जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख-पाटील ,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष . सतीश लोंढे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, शहरप्रमुख संजय मुंडे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, भीमा अण्णा जाधव, हनुमंत देवकत्ते, शिवअल्पसंख्याक सेना जिल्हाध्यक्ष अमीर शेख, युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय राठोड, निलेश शिंदे, विभागप्रमुख मुकेश पाटील, धनंजय इंगळे, सौदागर जगताप, एस टी. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश मंडोळे, सचिन लोंढे, दत्ता अण्णा घाडगे, नाना शेख, दिनेश लोहार, नितीन धोंगडे, माणिक साठे, किशोर सुडके, सागर सुडके, मोहन काकडे, हरिभाऊ मगर, अतिक सय्यद, आदी उपस्थित होते.