उस्मानाबादेत पोलिसाने बलात्कार केल्याने महिलेची आत्महत्या 

 
उस्मानाबादेत पोलिसाने बलात्कार केल्याने महिलेची आत्महत्या

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक भागातील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट सापडली आहे. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होणार का ?  याकडं लक्ष वेधलं आहे. 


३२ वर्षीय  महिलेने सुसाईड नोटमध्ये हरिभाऊ रामदास कोळेकर या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव लिहिले असून, त्याने आपणास बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला तसेच तो नेहमी धमकावत होता, असे लिहिले आहे. 

अखेर गुन्हा दाखल

एका 32 वर्षीय विवाहीतेने (नाव- गाव गोपनीय) 02 मार्च रोजी बांधकामाच्या ठिकाणी गळफास घेउन आत्महत्या केली. या प्रकरणी मयतेच्या पतीने प्रथम खबर दिली की, “उस्मानाबाद पोलीस दलातील एका पोलीसाने (नाव- गाव गोपनीय) सप्टेंबर 2020 पासून वेळोवेळी माझ्या पत्नीस बंदुकीचा धाक दाखवून तीचे लैंगीक शोषण केल्याने तीने आत्महत्या केली आहे.” यावरुन संबंधीत पोलीसाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376, 306, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web