उस्मानाबादेत अवैध बांधकाम प्रकरणी दोन गुन्हे दाखल

अन्य लोकांवर कारवाई केव्हा ? 
 
उस्मानाबादेत अवैध बांधकाम प्रकरणी दोन गुन्हे दाखल

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात अवैध बांधकाम मोठ्या प्रमाणात झाली आहेत. अखेर दोन जणांविरुद्ध पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत, मात्र बाकी जणांवर  केव्हा कारवाई करणार ? असा प्रश्न  विचारला जात आहे. 

अनाधिकृत बांधकाम प्रकरणी उस्मानाबाद शहरातील तौफीक पठाण, रा. हनुमान चौक, बार्शी रोड यांसह बालाजी जनक कुंभार, रा. तांबरी विभाग यांना उस्मानाबाद नगरपालीकेतर्फे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम- 53 (1) अंतर्गत नोटीस देण्यात आली होती. त्यात अवैध बांधकाम काढून टाकावे किंवा खुलासा सादर करावा असे सुचित करण्यात आले होते. परंतु नोटीस मुदत संपली असतांनाही त्या दोघांनी तशी कृती केली नाही. यावर उस्मानाबाद नगरपालीका कर्मचारी- सुनिल कांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उपरोक्त नमूद कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे नमूद दोघांविरुध्द काल दि. 28.12.2020 रोजी दाखल करण्यात आले आहेत.

अन्य लोकांवर कारवाई केव्हा ? 

उस्मानाबाद शहरात अनेक ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले आहेत. पालिकेकडे लेखी तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहेत, मात्र केवळ तोंड बघून कारवाई केली जात आहे. अनेक बड्या लोकांनी अवैध बांधकाम केले असताना, पालिका मूग गिळून गप्प आहे. 

From around the web