उस्मानाबादेत हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
उस्मानाबादेत हाणामारीचे दोन गुन्हे दाखल

उस्मानाबाद - सुरेखा माणिक कोरे, रा. शाहुनगर, काकडे प्लॉट, उस्मानाबाद या पती- माणिक कोरे यांसह दि. 02.11.2020 रोजी 13.30 वा. सु. शाहुनगर येथील आपल्या कापड दुकानात होत्या. यावेळी शेखर शिवाजी चव्हाण, रा. स्वामी हॉस्पीटल समोर, उस्मानाबाद यांच्या सोबत सहा अनोळखी स्त्रीया व दोन पुरुषांनी बेकायदेशीर जमाव जमवून सुरेखा यांच्या कापड दुकानासमोर येउन पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन सुरेखा यांसह त्यांचे पती- माणिक कोरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वायरने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेखा कोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504 अन्वये दि. 04.11.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  यश वैभव हंचाटे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांना पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 04.11.2020 रोजी 14.00 वा. सु. हनुमान चौक, उस्मानाबाद येथे 1)निखील मोहिते 2)बबलु आमलेकर, दोघे रा. उस्मानाबाद या दोघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धारदार श्स्त्राने डोक्यात वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या यश हंचाटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


शेतातील ऊसाचे पिक जाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग: केबल वायर अंथरण्याच्या कारणावरुन 1)अशोक धेनु चव्हाण 2)शशीकांत धेनु चव्हाण 3)संतोष धेनु चव्हाण, तीघे रा. निलेगांव तांडा, ता. तुळजापूर यांनी दि. 04.11.2020 रोजी 12.00 वा. सु. अल्लामाबी शकील नदाफ, रा. नन्हेगांव, ता. अक्कलकोट यांच्या निलेगांव सर्वे क्र. 180 मधील 3 एकर ऊसाच्या पिकास आग लावून नदाफ यांचे अंदाजे 5,00,000 ₹ चे आर्थिक नुकसान केले. यावर अल्लामाबी नदाफ यांनी त्या तीघांस जाब विचारला असता त्यांनी अल्लामाबी यांसह त्यांच्या मुलास शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अल्लामाबी नदाफ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web