उस्मानाबाद : टाटा टेम्पो चोरीस

 

 

उस्मानाबाद : टाटा टेम्पो  चोरीसउस्मानाबाद - सय्यद जावेद जलील, रा. ख्वॉजानगर, उस्मानाबाद यांनी आपला टाटा टेम्पो क्र. एम.एच. 42 बी 9909 हा दि. 23.09.2020 रोजी 20.00 वा. सु. उस्मानाबाद येथील धारासुर मर्दीनी देवी मंदीर परिसराच्या मोकळ्या जागेत लावला होता. तो त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या जागी आढळला नाही. 


यावरुन तो अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सय्यद जलील यांनी दि. 01.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 मोटार वाहन कायदा अंतर्गत 109 कारवाया- 21,700 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त


उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 01.10.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 109 कारवाया करुन 21,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

 

मनाई आदेशांचे उल्लंघन 7 पोलीस कारवायांत 1,700/-रु. दंड वसुल


उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 01.10.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 5 कारवायांत- 1,000/- रु. दंड प्राप्त.

2)सार्वजनिक ठिकाणी सुरक्षीत अंतर न राखणे: 1 कारवाईत- 200/- रु. दंड प्राप्त.

2)किराणा दुकानांसमोर भावफलक न लावणे: 1 कारवाईत- 500/- रु. दंड प्राप्त.

From around the web