सिव्हिल हॉस्पिटलमधील वाहकासह तिघांना बेदम मारहाण 

कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, पोलिसांची मध्यस्थी 
 
सिव्हिल हॉस्पिटलमधील वाहकासह तिघांना बेदम मारहाण

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना तीन जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी  गुरुवारी सकाळी काम बंद आंदोलन सुरु केले होते , मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून आणि आरोपीना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील वाहनांवर चालक म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी मेजर दिगंबर पवार हे सीएस ऑफिस समोरील जुन्या इमारतीतील एका खोलीतच वास्तव्यास आहेत. दररोजप्रमाणे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सदरील कर्मचारी आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसह रूमवर थांबले होते. यावेळी इतर दोन चालकही जेवण करून तेथे गप्पा मारण्यासाठी दाखल झाले.

हे सर्वजण रुममध्ये असताना ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञाताने त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला. यावेळी पवार यांनी आतून कोण आहे अशी विचारणा केल्यावर बाहेरून मोठ्याने शिविगाळ करण्यास प्रारंभ होऊन दरवाजावर लाथा मारण्यास प्रारंभ झाला. यामुळे पवार यांनी दरवाजा उघडला असता बाहेरील तिघांनी थेट पवार यांच्यासह आतमधील चालक संदीप जाधवर, बालाजी बांगर, गणेश भालेराव, सुनील मोरे यांना लाकडाने व लाथाबुक्क्या बेदम मारहाण करण्यास प्रारंभ केला. यावेळी सदरील तिघापैकी एकाने चाकूने वार केल्याने बालाजी बांगर हे जखमी झाले. त्यांच्या पोटाजवळ हा वार झाला असला तरी गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, दिगंबर पवार यांना मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 

याप्रकरणी दिगंबर पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात पक्या, लल्ल्या (पूर्ण नाव माहिती नाही) व अन्य एक अशा तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सकाळी दहा वाजेच्या सुमारास सिव्हिलमधील सर्व कर्मचारी या घटनेच्या निषेधार्थ कामबंद अांदोलन करत सिव्हिलबाहेर जमा झाले. यावेळी सततच्या अशा घटनांमुळे कर्मचारी दहशतीखाली काम करत असून अशा टवाळखोरांवर पोलिस प्रशासनाने दहशत निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर सिव्हिल प्रशासन व पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाईचे आश्वासन दिल्यावर कर्मचारी कामावर रुजू झाले.

VIdeo


 

From around the web