महिला स्नान करीत असताना लपून मोबाईलवर चित्रीकरण केले
उस्मानाबाद : महिला स्नान करीत असताना लपून मोबाईलवर चित्रीकरण केल्याप्रकरणी एका तरुणावर उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद शहरातील एक तरुणी (नाव- गाव गोपनीय) दि. 01 सप्टेंबर रोजी पहाटे स्नानगृहात स्नान करत होती. यावेळी शेजारी राहनाऱ्या एका तरुणाने लपून- छपून तिच्या नकळत स्नानगृहाच्या खिडकीतून भ्रमणध्वनीच्या सहायाने तीचे छायाचित्रण करुन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354 (क) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाणीचे दोन गुन्हे दाखल
लोहारा : मार्डी, ता. लोहारा येथील सहदेव मारुती शेंडगे यांसह त्यांचे 4 कुटूंबीय यांचा गावातीलच नातेवाईक- कृष्णा हनुमंत शेंडगे यांसह त्यांचे 4 कुटूंबीय यांच्याशी शेतातील रहदारीच्या कारणावरुन व पुर्वीच्या वादावरुन दि. 30.08.2021 रोजी 17.30 वा. सु. मार्डी येथे वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही शेंडगे कुटूंबीयांनी परस्परविरोधी कुटूंबातील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मारुती शेंडगे व कृष्णा शेंडगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
कळंब : कळंब येथील शिवाजी शेंडगे व बबलु चोंदे यांनी भुखंडाच्या व्यवहाराच्या कारणावरुन दि. 01 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. कळंब येथे बालाजी तुकाराम शेळके, रा. धानोरा (शेळका), ता. कळंब यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बालाजी शेळके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.