उस्मानाबाद नगर पालिका निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला 

लवकरच निवडणूक तारीख जाहीर होणार 
 
osmanabad np

उस्मानाबाद  - उस्मानाबाद नगर पालिका निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्याची अधिसूचना जारी केली आहे. 

उस्मानाबाद नगर पालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपत आहे. त्यामुळे निवडणूक दीपावली अगोदर की दीपावली झाल्यावर होणार ?  याकडे लक्ष वेधले आहे. 

उस्मानाबाद नगर पालिकेच्या मागील निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आला होता. शिवसेनेचे मकरंद राजेनिंबाळकर हे भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवारांचा प्रभाव करून निवडून आले होते. यंदा नगराध्यक्ष बहुमताच्या आकड्यावर निवडला जाणार आहे. 

मागील  निवडणुकीत एकूण १९ प्रभाग होते आणि ३९ नगरसेवक निवडून आले होते. त्यात राष्ट्रवादीचे १७, शिवसेनेचे ११, भाजपचे ८, काँग्रेस २ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये  केवळ सहा ते सात नगरसेवक उरले आहेत. 

उस्मानाबाद नगर पालिकेत सध्या महविकास आघाडी आहे, पण संभाव्य निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार की प्रत्येक पक्ष आपापली ताकद अजमावणार ? हे लवकरच कळणार आहे. 


नव्या फेररचनेननुसार प्रभाग राहणार नसून वार्ड राहणार आहे. त्यामुळे जवळपास ४० किंवा ४१ वार्ड राहणार आहेत. तसेच एकास एक लढत होणार असल्याने उमेदवारांची मोठी दमछाक होणार आहे. 

नगर पालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण राहणार का ? हा एक कळीचा मुद्दा राहणार आहे.  कायदेतज्ञाच्या मते जिथे ५० टक्के पेक्षा जास्त ओबीसी आरक्षण आहे, तिथे रद्दबातल झाले आहे. मात्र उस्मानाबाद नगर पालिकेत जेसे थे आरक्षण राहणार आहे. ओबीसी आरक्षण नसल्यास अनेक नगरसेवक अडचणीत येणार आहेत. 

From around the web