धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यावर कायदेशीर कारवाई करा

युवा सामाजिक कार्यकर्त्या सपना माळी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 
 
s

धाराशिव - माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती न दिल्यामुळे धाराशिव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, रचना सहाय्यक मनोज कलुरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्त्या सपना माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

धाराशिव शहरातील सर्व्हे नंबर १९० मधील आठ हजार चौरस मिटर क्षेत्राचे सीमांकन मोजणी नकाशा अभिन्यासास रेखांकनधारक सुधाकर भगवानराव शिंदे, अनिल काकासाहेब देशमुख तसेच धनंजय श्रीमंतराव रणदिवे यांना दिलेल्या तात्पुरर्ती व अंतिम मंजुरी संचिकेच्या प्रमाणित प्रती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकारात ६ जानेवारी २०२३ रोजी अर्ज दिला असता, जन माहिती अधिकारी तथा रचना सहाय्यक मनोज कलुरे यांनी एक महिन्यात विहित माहिती दिली नाही. त्यानंतर प्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे रीतसर अपील केले असता फड यांनीही याची सुनावणी घेऊन निकाल दिला नाही.

यामुळे मुख्याधिकारी वसुधा फड, रचना सहाय्यक मनोज कलुरे यांनी नियमाचे उल्लंघन केल्याने या दोघवर भादंवि १८६० चे कलम १६६, १७५, १७६,१८८, २१७ नुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सपना माळी यांनी या निवेदनात केली आहे.

dc

s

sd

From around the web