उस्मानाबादेत जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टराची कमतरता 

कोरोनाचा फैलाव रोखणार कसा ? 
 
उस्मानाबादेत जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टराची कमतरता
राज्यमंत्री संजय बनसोडे यांना निवेदन 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा फैलाव मोठया प्रमाणात झाला असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे. यासंदर्भात राज्यमंत्री संजय बनसोडे यांनाआज निवेदन देण्यात आले. 


उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत असून 7608 रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण 44698 रुग्ण रुग्ण कोरोना बाधित झाले असून एकुण 1032 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूचा दर 2.32 टक्के  असून मराठवाडयात सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात 60 आयसीयू बेडसाठी केवळ 2 भीषक व 2 भूलतज्ञ आहेत. रुग्ण संख्येच्या प्रमाणात डॉक्टर्स व इतर सपोर्टींग स्टाफ फारच कमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सीजन, बेड व आयसीयू ची गरज वाढली असून उपचारासाठी विशेषज्ञांची अत्यंत आवश्यकता आहे.

जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय वैद्यकीय  केंद्रासाठी विशेषज्ञ डॉक्टर्स व सपोर्टींग स्टाफ तातडीने उपलब्ध करुन द्यावा,  अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चेचे जिल्हाध्यक्ष  राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी  राज्यमंत्री संजय बनसोडे  यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी  प्रीतम मुंडे , प्रसाद मुंडे, स्वप्नील नाईकवाडी आदी उपस्थित होते,

From around the web