उस्मानाबादेत शिवसेनेच्या वतीने १२५ बेड्सचे अद्ययावत कोविड सेंटर लवकरच सुरु होणार
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज किमान २० जणांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने १२५ बेड्सचे अद्ययावत कोविड सेंटर लवकरच सुरु होणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेकरिता अधिक बेड उपलब्ध व्हावेत. यासाठी कोरोना बाधित रुग्णांसाठी शिवसेना, पवनराजे फाउंडेशन, नगरपालिका उस्मानाबाद व IMA च्या संयुक्त विद्यमानाने समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स, उस्मानाबाद येथे १२५ बेड्चे कोविड सेंटर सुरू करण्यात येत असून त्यापैकी ५० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा देण्यात येणार आहेत.
उत्तम आरोग्य व्यवस्था, तज्ञ डॉक्टर्स आदी सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना योग्य उपचार देणे व कोरोनाचा फैलाव थांबवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आआवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.