उस्मानाबादेत पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

वाचाळ रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचाही केला निषेध
 
उस्मानाबादेत पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

उस्मानाबाद -  पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरुद्ध शिवसेना आज रस्त्यावर उतरली. तसेच वाचाळ  बोलणाऱ्या रावसाहेब दानवे यांचाही तीव्र शब्दात निषेध नोंदविला. 
 

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाचे भाव पडलेले असताना देखील केंद्र सरकार डिझेल व पेट्रोलच्या दरात दिवसागणिक पैशाच्या पटीत वाढ करीत असून ही वाढ शंभर रुपयांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडून सर्वसामान्यांना या महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. डिझेल व पेट्रोलचे दर तात्काळ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. 

तसेच केंद्रीय पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा घोर अपमान केला आहे. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून या अशा वाचाळ वक्तव्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आला. यापुढे जर त्यांनी ‌अशा प्रकारे वक्तव्य बंद नाही केली तर घरात घुसून आंदोलन करू ,असा इशारा देत दानवे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला.

शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेले आंदोलन शिवसेना संपर्क कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत करण्यात आले. या मोर्चात केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात व शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवे यांच्या वक्तव्यांचा निषेध तीव्र निषेध करीत विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 

या आंदोलनात शिवसेना उस्मानाबाद तालुका प्रमुख सतीषकुमार सोमाणी, जिल्हा उपप्रमुख विजय सस्ते, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, गटनेता सोमनाथ गुरव, माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे, भिमाण्णा जाधव, उस्मानाबाद शहर प्रमुख संजय (पप्पू) मुंडे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, विजय घोणे, प्रदीप साळुंखे, रवी वाघमारे, सुरेश गवळी, पंकज पाटील, गुणवंत देशमुख, संजय खडके, साजिद आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

From around the web