उस्मानाबादच्या सार्थक अंधारे याची सातारा सैनिक स्कूलसाठी निवड 

आ कैलास पाटील यांच्याकडून कौतुक आणि सत्कार... 
 
s

उस्मानाबाद - शहरातील बेंबळी रोडवरील ओमनगर मधील शिक्षक सचिन अंधारे यांचा मुलगा सार्थक अंधारे ( इयत्ता सहावी ) याची सातारा येथील सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे. 


सैनिक स्कूल, सातारा येथे पुढील शिक्षणासाठी राज्यातील फक्त ६० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. उस्मानाबादचा सार्थक सचिन अंधारे हा जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याने त्याची निवड झाली आहे. 


या निवडीबद्दल शिवसेना आमदार आ  कैलास पाटील यांनी  त्याच्या घरी जाऊन सार्थक व त्याच्या कुटुंबियाचे कौतुक करून  सत्कार केला . आपल्या जिल्ह्यातील मुलांनी यातून प्रेरणा घेवून असेच यश मिळवून जिल्ह्याचे नाव करावे असेही आ कैलास पाटील यांनी सांगितले व सार्थकला पुढील  शैक्षणिक वाटचालीस  शुभेच्छा दिल्या .

   या सत्कारप्रसंगी आ कैलास पाटील यांच्यासोबत गटनेते तथा नगरसेवक सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रविण भैय्या कोकाटे ,  युवासेना उपजिल्हा प्रमुख निलेश शिंदे , संतोष वाडेकर , हणमंत देवकते , राजाभाऊ क्षीरसागर सर ,  विकास चव्हाण सर , सचिन अंधारे सर , चव्हाण सर  व मित्र मंडळीची उपस्थिती होती .

From around the web