राजेश्वरी गरड हिची बेंगलोरच्या इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये निवड
तेरणा महाविद्यालयाच्या वतीने राजेश्वरी गरड हिचा सत्कार
उस्मानाबाद - तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी राजेश्वरी माणिकराव गरड हिची भारत सरकार संचालित इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड,बेंगलोर या अभियांत्रिकी,टेलिकॉम,नेटवर्किंग उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत अभियंतापदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राजेश्वरी गरड हिने उस्मानाबादच्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकीची पदवी घेतली. अथक प्रयत्न, अभियांत्रिकी तसेच ऍप्टिट्यूड स्किल्सचा सराव करत तिने नी हे यश प्राप्त केले. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी कुमारी राजेश्वरी गरड हिचा सत्कार केला. .
यावेळी डीन अकॅडेमिक्स डॉ .डी.डी .दाते , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा.अशोक माने, प्रा अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते . गरड हिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील , आमदार राणा जगजितसिंह पाटील ,संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे ,उपप्राचार्य प्रा.एम.डी.पाटील तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले .