उस्मानाबाद तहसील कार्यालयात नागरिकांची लूट ( व्हिडिओ )
उस्मानाबाद - उस्मानाबाद तहसील कार्यालयात नकलेच्या प्रतीसाठी लूट केली जात आहे. एका पान - पेज साठी चक्क ३० रुपये आकारले जात आहेत. तसेच ही रक्कम बँकेत जमा न करता अधिकाऱ्यांच्या घशात जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केला आहे.
उस्मानाबाद तहसील कार्यालयात कागदपत्रांच्या नकल प्रतीसाठी दररोज शंभराहून अधिक अर्ज येतात. एक तर नक्कल प्रत वेळेवर दिली जात नाही तसेच अव्वाच्या सव्वा फी आकारली जात आहे, विशेष म्हणजे पावती मागितली असता दिली जात नाही.
तहसील कार्यालयात दररोज नकलेच्या प्रतीसाठी किती अर्ज आले, याचे रेकॉर्ड ठेवले जात नाही, किती रक्कम आली याचीही स्वतंत्र नोंद वही (कॕश बुक) ठेवले जात नाही, तसेच नकलेसाठी जमा झालेली रक्कम दररोजच्या दररोज चलनद्वारे बँकेत भरली जात नाही, त्यामुळे दररोज जमा होणारी पाच ते सात हजार रक्कम कोणाच्या घशात जाते, असा सवालही सुभेदार यांनी विचारला आहे.
एका नक्कल ( पान / पेज ) प्रतसाठी फार तर दहा रुपये रक्कम अपेक्षित असताना चक्क 30 रुपये आकारून नागरिकांची लूट केली जात असल्याचा आरोपही सुभेदार यांनी केला आहे.
याबाबत तहसीलदार गणेश माळी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही, असे माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी सांगितले.
असा आहे नियम
- नकलेसाठी एका पान / पेज साठी सात रुपये आणि अर्जंट असेल तर २१ रुपये असा दर आहे. तसेच नागरिकांना पावती देणे बंधनकारक आहे.
- नकल देणाऱ्या कर्मचाऱ्यास तहसील कार्यलयाकडून अथवा शासनाकडून वेतन दिले जात नाही, म्हणून लूट सुरु आहे. त्यात अधिकारीही हात धुवून घेत आहेत.
व्हिडीओ पाहा