उस्मानाबादचे तलाठी कार्यालय कुलूप बंद

नागरिकांची होतेय प्रचंड गैरसोय 
 
उस्मानाबादचे तलाठी कार्यालय कुलूप बंद

उस्मानाबाद -  जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरातील नागरिकांसाठी सुरू असलेले तलाठी कार्यालय सतत कुलूप बंद असल्यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच तलाठी कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे हेलपाट्यावर हेलपाटे मारून नागरिकांची दमछाक होत असल्याने असून अडचण नसून... खोळंबा या प्रमाणे शहरवासियांची अवस्था झालेली आहे.

उस्मानाबाद शहराची वाढती लोकसंख्या त्यातच जागेचे मोठ्या प्रमाणात‌होणारे नोंदीचे व्यवहार होत असल्यामुळे सातबारा, आठ अ यासह इतर कामकाजासाठी यासाठी नागरिकांना या ठिकाणी सतत यावे लागत आहे.विशेष म्हणजे सदरील तलाठी कार्यालय महसूल बहन लगत असलेल्या भुमी अभिलेख व उपविभागीय कार्यालयाच्या लगत असल्यामुळे नागरिकांची सतत वर्दळ असते. जागेच्या नोंदणीचे फेरफार मंजूर करण्यासाठी तलाठी कार्यालयातून अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी केली जात असल्यामुळे या सज्जा अंतर्गत कार्यरत असलेले दोन तलाठी एका वर्षाच्या आत लाच घेताना पकडले गेले आहेत. त्यामुळे या तलाठी कार्यालयात किती व कशा प्रकारचे व्यवहार होतात व केले जातात याची प्रचिती आपोआपच येते. 

हे कार्यालय सतत वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असल्यामुळे नवीन तलाठी याठिकाणी कार्यभार स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे तीन महिने हे कार्यालय तलाठ्या विनाच सुरू होते. मात्र त्यानंतर पवार यांनी या ठिकाण यांच्या पदभार स्वीकारला मात्र त्यांनादेखील अतिरिक्त कामाचा ताण होत असल्यामुळे ते केव्हा तहसील कार्यालय तर इतर कामासाठी बाहेर जात असल्यामुळे हे कार्यालय तलाठ्याविनाच  असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना आल्या पावलांनी माघारी जावे लागत आहे. त्यातच मार्च अखेर असल्यामुळे वेगवेगळ्या कामासाठी नागरिकांची सतत या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता हे कार्यालय सुरू राहील अशी व्यवस्था तहसिलदारांनी करावी अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

From around the web