उस्मानाबादेत तोतया पोलिसांकडून एकाची फसवणूक

 

  

उस्मानाबादेत तोतया पोलिसांकडून एकाची फसवणूक


उस्मानाबाद - पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्याचे प्रकार उस्मानाबाद शहरात वाढले आहेत. शहरातील एका व्यक्तीस दोन भामट्यानी हातोहात फसवल्याचे समोर आले आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की ,  बाबूराव महादेव क्षीरसागर, वय 68 वर्षे, रा. उंबरे कोठा, उस्मानाबाद हे आज दि. 31.10.2020 रोजी 09.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील निरज गॅस कार्यालयासमोरील रस्त्याने जात होते. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या 2 अनोळखी पुरुषांनी बाबूराव क्षीरसागर यांना थांबवले. त्या दोघांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करुन बाबूराव क्षीरसागर यांना अंगावरील दागिने काढून रुमालात बांधून ठेवण्यास सांगीतले. यावर क्षीरसागर यांनी हातातील 30 ग्रॅम सोन्याची अंगठी काढून रुमालात बांधत असतांना त्या दोघा पुरुषांनी हातचलाखीने रुमालात बांधलेली अंगठी काढून घेतली. थोडया अंतरावर गेल्यानंतर बाबूराव क्षीरसागर यांना संशय आल्याने त्यांनी खात्री केली असता रुमालातील ती अंगठी आढळली नाही. अशा मजकुराच्या बाबूराव क्षीरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 170, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

From around the web