“चोरीस गेलेल्या दोन चाकांसह संशयीत ताब्यात.”

 
“चोरीस गेलेल्या दोन चाकांसह संशयीत ताब्यात.”


स्थानिक गुन्हे शाखा (LCB):  उस्मानाबाद येथील निरज गॅस एजन्सी चा नादुरुस्त ट्रक दि. 28.02.2020 ते 07.04.2020 या कालावधीत उस्मानाबाद येथील एजन्सीच्या गोडावून परीसरात लावला होता. दरम्यान ट्रकच्या मागील ऍक्सलची दोन चाके (किं.अं. 60,000/-रु.) अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. यावरुन पो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 119/2020 भा.दं.वि. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 08.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, सपोफौ- खोत, पोहेकॉ- जगताप, थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण यांच्या पथकाने दि. 08.04.2020 रोजी मौजे मेडसिंगा, ता. उस्मानाबाद येथे छापा टाकून गुन्ह्यातील चोरीचा वरील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेला टाटा कंपनीचा ॲपे ऑटो (किं.अं. 1,20,000/-रु.) व संशयीत आरोपी- 1)अमर रामभाऊ ताटे रा. मेडसिंगा, ता.उस्मानाबाद 2)अजीम सलीम शेख रा. उस्मानाबाद यांना ताब्यात घेउन पुढील तपासकामी आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

From around the web