डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांना कारणे दाखवा नोटीस

 
उस्मानाबाद लाइव्हचा दणका 

डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांना कारणे दाखवा नोटीस

उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर  पुणे वारी करणाऱ्या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी कारणे  दाखवा नोटीस बजावली  आहे.

डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांचा बेजबाबदारपणा उघडकीस

पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असताना उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे शासकीय वाहन घेऊन कुटुंबाला भेटायला पुण्याला गेले होते. इतकेच काय तर त्यांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतली नव्हती.  उस्मानाबाद लाइव्हने या संदर्भात सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करून  अजिंक्य पवार यांचा बेजबाबदारपणा उघडकीस आणला होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.काय आहे प्रकरण ? 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे उस्मानाबादच्या बँक कॉलनीमध्ये एका खासगी जागेत भाड्याने राहतात. ते उस्मानाबादेत एकटेच तर त्यांची फॅमिली पुण्यात राहते. लॉकडाऊनमुळे त्यांची घरगुती अडचण झाली आहे.

१७ एप्रिलला ते पुण्याला फॅमिलीला भेटायला गेले होते. २० एप्रिल (सोमवारी) रोजी पहाटे ते उस्मानाबादेत परत आले.अजिंक्य पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता मुख्यालय सोडले, त्यांनी खासगी कामासाठी शासकीय वाहनाचा गैरवापर केला, शिवाय प्रशासनाचा पास नसताना पदाचा गैरवापर केला. त्यांच्यावर  कडक कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली होती.उस्मानाबाद लाइव्हमध्ये सकाळी याबाबत वृत्त प्रकाशित होताच, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली  आहे.

कोरोना  विषाणू संसर्ग असताना, आपण  पूर्व परवानगी न घेता मुख्यलाय का सोडले? आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करू नये म्हणून विचारणा पवार यांना करण्यात आली आहे.२४ तासात खुलासा करावा अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली आहे.

केंद्रे यांची  औरंगाबाद वारी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी पुणे वारी केल्याचे उघडकीस आल्यानंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी एस.जी.केंद्रे यांनी औरंगाबाद वारी केल्याचे समोर आले आहे. पवार पाठोपाठ केंद्रे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

नोटीस वाचा 

डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांना कारणे दाखवा नोटीसFrom around the web