तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांच्या वसतीगृहात २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू !

 
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांच्या वसतीगृहात २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू !


उस्मानाबाद -जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढ लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी आधीच पूर्वतयारी करणे अगत्याचे असून नागरिकांच्या सुविधेसाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय मुलांचे वसतीगृह, उस्मानाबाद येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
याठिकाणी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी भेट देवून पाहणी केली तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य हेच आपल्यासाठी सर्वात अधिक महत्त्वाचे असून त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करीतच आहोत. या कोविड केअर सेंटरचाही रुग्णांना लाभ होऊन कोरोना संसर्गाच्या मुक्तीकडे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, हा विश्वास वाटतो, असे आ.राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले.

From around the web