आ. कैलास पाटील यांना कोरोनाची बाधा, पुण्यात होम क्वारंटाइन
Sep 11, 2020, 16:16 IST
उस्मानाबाद : उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांना शुक्रवारी कोरोनाची बाधा झाली आहे. पाटील सध्या पुण्यात असून, होम क्वारंटाइन झाले आहेत.
आ. कैलास पाटील मुंबईत दोन दिवस झालेल्या अधिवेशनात सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता, परंतु आज पुन्हा तपासणी केली असता, अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.
आ. पाटील यांनी, फेसबुकवर एक पोस्ट लिहून, खालील आवाहन केले आहे.
नमस्कार,
आजच काही वेळापुर्वी माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अधिवेशनाच्या अगोदरही मी टेस्ट केली होती, त्यावेळी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने मी अधिवेशनात सहभागी झालो होतो.पण काल पुन्हा टेस्ट केली होती, अहवाल आताच प्राप्त झाला असुन त्यामध्ये मी पॉझिटिव्ह आलो आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसापुर्वी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी काळजी घ्यावी व लक्षणे आढळुन येत असल्यास तातडीने टेस्ट करुन घ्यावी असे मी आवाहन करतो. माझी प्रकृती ठिक असुन काळजीचे कोणतेही कारण नाही. लवकरच उपचार घेऊन मी पुन्हा तुमच्या सेवेसाठी तयार असेन असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. आपलाच, कैलास पाटील.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची फेसबुक पोस्ट
माझे सहकारी व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत या कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य जनतेत सामावून जनतेची सेवा करत आहात. सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद आणि सदिच्छा आपल्या पाठीशी असुन आपण कोरोनारूपी संकटावर मात करून आपण पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा सक्रिय व्हाल, ही आई तुळजाभवानी माते चरणी प्रार्थना..
- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर