मंदिर हा विषय महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा - अॅड. मिलिंद पाटील

 
मंदिर हा विषय महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा - अॅड. मिलिंद पाटील


रुईभर - मंदिर हा विषय महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा विषय असून महाराष्ट्र सरकारने बंद केलेली मंदिरे तातडीने उघडावीत व भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र वकील सेलचे प्रमुख अॅड. मिलिंद पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने दिलेल्या निर्देशानुसार रुईभर येथील दत्त मंदिरासमोर महाआरती करण्यात आली, यावेळी पाटील बोलत होते. यावेळी महाआरतीला पंचायत समितीचे माजी सभापती तथा पंचायत समितीचे सदस्य बालाजी गावडे, माजी उपसभापती नाना कदम, संतोष आगलावे, नवाब पठाण, अंकुश तानवडे, रुईभर चे उपसरपंच बालाजी कोळगे ,नामदेव जाधव, बाळासाहेब जमदाडे, राजा भणगे,अशोक शिरसाठे, बाबासाहेब कोळगे,सतीश कोळगे, पोपट आगळे, शंकर वडवले, किशोर कोळगे, सुरेश कलाल,अमरसिंह कोळगे, धीरज कोळगे, तेजसिंह कोळगे, विश्वजीत गव्हाणे, निखील भोयटे, संतोष कोळगे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे यांनी मानले.

From around the web