रुई (ढोकी) येथे रक्तदान रक्तदान शिबीर

 

रुई (ढोकी) येथे रक्तदान रक्तदान शिबीर

रुई ढोकी - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत  उस्मानाबाद तालुक्यातील रुई (ढोकी) येथील तरुणांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले  होते.. यावेळी जवळपास ६५ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.

      रक्तदान शिबिरासाठी सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांनी सहकार्य केले तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी गावातील सत्यजित राऊत, अभिजित पाटील, स्वप्नील विश्वासे, दिनेश घोडके, राहुल खडके, शशिकांत कोकाटे या तरुणांनी विशेष परिश्रम  घेतले.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्टासह उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रक्तसाठा कमी असल्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिराला प्रतिसाद देत गावातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच रक्तदान करतेवेळी सोशल डिस्टनसिंग पाळण्यात आले

From around the web