पोलीस अधीक्षकांनी केली ड्रोनद्वारे संचारबंदीची पाहणी...
Apr 11, 2020, 19:14 IST
उस्मानाबाद - लॉकडाउन- संचारबंदी अंमलात असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने फिरत असतात. अशा व्यक्तींना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलात दोन ड्रोन दाखल झाले आहेत.
या ड्रोन मार्फत गर्दी निर्माण होउ शकनाऱ्या संभाव्य भागांवर देखरेख केली जात आहे. आज दि. 11.04.2020 रोजी पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी उस्मानाबाद शहर व परिसरातील संचारबंदीचे निरीक्षण ड्रोनद्वारे केले.
आय.टी.सेल. चे पोना- अमोल निंबाळकर यांनी ड्रोन हाताळणी करुन शहर व परिसराचे प्रत्यक्ष चित्रण उपस्थितांना स्क्रिनवर दाखवले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी, मोतीचंद राठोड, स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. शेख व उस्मानाबाद शहर, आनंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी हजर होते.