संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारी वाहने जप्त

 
संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारी वाहने जप्त

उस्मानाबाद जिल्हा:  संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी दि. 14.04.2020 पर्यंत लॉकडाउनचा सरकारी आदेश झाला आहे. असे असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या पथकाने दि. 01.04.2020 रोजी वाहतुक शाखा- 11 वाहने, कळंब पो.ठा.- 27 वाहने, उमरगा पो.ठा.- 6 वाहने, लोहारा पो.ठा.- 8 वाहने, आनंदनगर पो.ठा.- 10 वाहने अशी एकुण 62 वाहने विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने ती वाहने ताब्यात घेउन संबंधीत पोलीस ठाणे येथे जमा केली आहेत.
तर आज दि. 02.04.2020 रोजी उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. 9  वाहने, आनंदनगर पो.ठा.- 10 वाहने, उमरगा पो.ठा.-7 वाहने, मुरुम पो.ठा.-7 वाहने, लोहारा पो.ठा.-3 वाहने, कळंब पो.ठा.- 16 वाहने, आंबी पो.ठा.-6 वाहने अशी एकुण 58 वाहने जप्त केली आहेत. सदर वाहने संचार बंदी संपताच मुळ मालकास परत करण्यात येतील.
ही वाहन जप्तीची कारवाई लॉकडाउन असे पर्यंत दररोज केली जाणार आहे. नागरीकांनी विनाकारण घरा बाहेर पडून लॉकडाउनच्या उद्देशाला हरताळ फासु नये असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी केले आहे.

From around the web