“उस्मानाबाद पोलीस दलात सॅनिटायझर व्हॅन दाखल "

 

“उस्मानाबाद पोलीस दलात सॅनिटायझर व्हॅन दाखल "

उस्मानाबाद - कोरोना या संसर्गजन्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ  नये म्हणुन जिल्हा पोलीस दलातील सर्व कार्यालय, पोलीस ठाण्यात  दारासमोर  हात स्वच्छ धुन्यासाठी साबन, सॅनिटायझर, पाणी यांची व्यवस्था नळ- टाकी लाउन करण्यात आली आहे.

लॉकडाउन- संचारबंदी काळात बंदोबस्तास असणाऱ्या पोलीसांना सॅनिटाईज करण्यासाठी  पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांच्या संकल्पनेतून जिल्हा पेालीस दलातील एका वाहनास सॅनिटायझर व्हॅनचे स्वरुप देण्यात आले आहे. पोलीस जवान त्या व्हॅन मध्ये जाताच चालकाजवळ असलेली कळ दाबून त्या पोलीसाच्या अंगावर फवाऱ्याद्वारे सॅनिटायझर फवारण्याची व्यवस्था त्या व्हॅन मध्ये करण्यात आली आहे. अशा प्रकारे बंदोबस्तास असनाऱ्या पोलीसांना या व्हॅन मार्फत सुविधा दिली जाणार आहे.From around the web