कोरोनावर मात केलेल्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस दलातर्फे अभिनंदन

 
कोरोनावर मात केलेल्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस दलातर्फे अभिनंदन

उस्मानाबाद - कोरोना योध्दे असलेले देशभरातील अनेक पोलीस कोविड- 19 संसर्गाचे बळी ठरत आहेत. उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय कोविड- 19 संसर्गाने बाधीत आढळल्यास त्यांच्या उपचाराकरीता तसेच क्वारंटाईन कक्षा करीता तुळजापूर येथील साप्ताहीक बाजार परिसरात असणाऱ्या मंदीर संस्थानच्या भक्त निवास ईमारती मधील तिसरा मजला मा. पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांच्या प्रयत्नातून राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्याकरीता वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

या ठिकाणी उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 10 पोलीस कर्मचारी हे औषधोपचाराने कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज दि. 06.08.2020 रोजी घरी पाठवण्यात आले. याप्रसंगी पोलीस दलातर्फे गुलाब पुष्प देउन त्यांचे अभिनंदन करण्यात आल्याने ते कर्मचारी सुखावले. कोविड- 19 बाधीत आणखी 7 पोलीस कर्मचाऱ्यांवर या ठिकाणी औषधोपचार सुरु असून 5 पोलीस कर्मचारी हे क्वारंटाईन कक्षात आहेत. 

From around the web