चोरीचे दागिने, रोख रक्कम, चार मोबाईल फोनसह संशयीत चोर ताब्‍यात

 
चोरीचे दागिने, रोख रक्कम, चार मोबाईल फोनसह संशयीत चोर ताब्‍यात

उस्मानाबाद : येडशी बाजारात एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन संशयीत चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्याजवळील चोरीचे दागिने, रोख रक्कम, चार मोबाईल फोन जप्त केला आहे.

पुजा संभाजी रणखांब रा. सोनेगाव, ता. उस्मानाबाद या दि. 13.01.2020 रोजी 13.00 वा. सु. मौजे येडशी येथे बाजारात असतांना 54,000/- रु. चे 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल फोन व रोख रक्कम 2,500/- रु. असलेली त्यांची पर्स अज्ञात चोरट्याने चोरली होती. यावरुन पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) येथे गु.र.क्र. 15/2020 भा.दं.वि. कलम- 379 प्रमाणे गुन्हा दि. 22.01.2020 रोजी दाखल आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि. . आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पाहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे, महिला पोकॉ- वैशाली सोनवणे यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी- गुड्डू तानाजी पवार, आकाश तानाजी पवार दोघे रा. पारधीपीडी, उस्मानाबाद यांच्या ताब्यातून वरील चोरीस गेलेल्या 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने वस्तु- पैसे यांसह तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत. नमुद आरोपींस पुढील तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

From around the web