पोलीस उपअधीक्षक अंजुमन शेख यांची अकोट येथे बदली

 


डीवायएसपी मोतीचंद  राठोड तीन वर्षे झाले तरी एकाच ठिकाणी तळ ठोकून !

पोलीस उपअधीक्षक अंजुमन शेख यांची अकोट येथे बदली



उस्मानाबाद -  उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक अंजुमन शेख यांची अकोट ( जि .अकोला ) येथे बदली झाली आहे. तर उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांची तीन  वर्षे झाले तरी बदली न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 



राठोड  हे उस्मानाबादला उपविभागीय अधिकारी म्हणून १६ सप्टेंबर २०१७  रोजी जॉईन झाले होते. त्यांची दोन किंवा तीन वर्षात अन्यत्र बदली होणे अपेक्षित असताना, त्यांची तीन वर्षे झाले तरी बदली न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.. 



राठोड यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. माहितीच्या अधिकारात माहिती दिली नाही म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई  करण्याचे निर्देश राज्य माहिती आयोगाने दिले होते.तसेच तुळजापूरचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोबरे आणि उमरगा पोलीस निरीक्षक सुरेश चाटे या दोन पोलीस निरीक्षकांच्या मुदतपूर्व बदली प्रकरणात औरंगाबाद  मॅटला चुकीचा अहवाल दिल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. 


राठोड यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहे. निलंबित शिक्षण अधिकारी सचिन जगताप याच्यावर विनयभंग प्रकरणी लवकर कारवाई न करणे, महिला पोलीस उपनिरीक्षक गिरी यांच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक खाडे  यास क्लीनचिट  देणे आदी त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीही राठोड एकाच जागी चार वर्षे कसे काय राहतात ? याबाबत उलट- सुलट चर्चा सुरु आहे. 


गेल्या आठ दिवसात राज्यभरातील अनेक पोलीस अधिक्षक, उप अधीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या बदल्या झाल्या आहेत, पण राठोड यांनी कोणचा  वशिला लावला म्हणून उस्मानाबादला तळ ठोकून आहेत ? अशी कुजबुज सुरु आहे. 


From around the web