उस्मानाबाद पोलीस दलात दोन ड्रोन दाखल

 

उस्मानाबाद पोलीस दलात दोन ड्रोन दाखल

पोलीस मुख्यालय, उ,बाद:   संचारबंदी काळात अनेक लोक जाणीवपुर्वक घरा बाहेर पडून संचारबंदीचा भंग करतात. पोलीसांची चाहुल लागताच पळून जातात. अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी उस्मानाबाद पोलीस दलात उच्च दर्जाचा कॅमेरा असलेली दोन ड्रोन दाखल झाली आहेत. 500 मी. उंची पर्यत व सुमारे 8 कि.मी. अंतरा पर्यंत रिमोट कंट्रोलने त्यांना हाताळता येणार आहे. या ड्रोन कॅमेऱ्याने घेतलेली छायाचित्रे- चित्रमुद्रण संगणकावर पाहण्याची सोय असुन त्याद्वारे गर्दीची ठिकाणे, मुख्य रस्ते इत्यादीवर देखरेख केली जाणार आहे.

पायी जाणाऱ्या 2 स्थलांतरीतांची रवानगी निवारा गृहात .”

पो.ठा. आनंदनगर:   संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर असुन दि. 14.04.2020 पर्यंत लॉकडाउनचा आदेश झाला आहे. असे असतांनाही बाहेर गावी राहणारे अनेक लोक मिळेल त्या साधनाने, लपून-छपून, पायी चालत आपल्या गावी परत येत आहेत. यातुन कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. कर्नाटक येथून उत्तर प्रदेश कडे आपल्या मुळ गावी पायी निघालेल्या दोन पुरुषांना सांजा चौक, उस्मानाबाद येथे आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने ताब्यात घेउन त्यांची रवानगी निवारा गृहात केली आहे.

From around the web