उस्मानाबाद पोलीस दलातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक यांचे मानचिन्ह

 

उस्मानाबाद पोलीस दलातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक यांचे मानचिन्ह

         उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलातील सात पोलीस कर्मचाऱ्यांना  उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  पोलीस  महासंचालक यांचे मानचिन्ह प्राप्त झाले आहे.

   महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध विभागांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- कर्मचारी यांना प्रति वर्षी महाराष्ट्र राज्य, पोलीस मुख्यालय, मुंबई तर्फे ‘पोलीस महासंचालक यांचे मानचिन्ह’ (DG Insignia) प्रदान केले जाते. सन- 2019 करीता मानचिन्ह प्राप्त सदस्यांची नावे आज दि. 30.04.2020 रोजी जाहिर करण्यात आली.

 त्यात उस्‍मानाबाद पोलीस दलातील1) कैलास सर्जेराव लहाने, पोलीस उपनिरिक्षक- पो.ठा. नळदुर्ग,  2) श्रीनिवास संभाजी घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक- तुळजापूर मंदिर चौकी,   3) प्रदीप महादेव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक- पो.ठा. तुळजापूर,   4) सुकूमार गणपत बनसोडे, पोलीस हवालदार- पो.ठा. तुळजापूर,  5) आत्माराम उत्तम जाधव, पोलीस हवालदार- पो.ठा. तुळजापूर,   6) सुनिल अमृत कोळेकर, पोलीस हवालदार- पो.ठा. कळंब 7) रामेश्वर बापूराव उंबरे, पोलीस हवालदार- पोलीस मुख्यालय. 

मानचिन्ह प्राप्त झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक  राज जिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक  संदीप पालवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

From around the web