तेर येथे शेताकडे जात असताना एकास लुटले
Apr 26, 2020, 20:22 IST
पोलीस ठाणे, ढोकी: संदिप रघुनाथ कचरे रा. तेर, ता. उस्मानाबाद हे दि. 20.04.2020 रोजी 22.30 वा. सु. तेर ते वानवाडी रस्त्याने मौजे चिखली येथील त्यांच्या शेताकडे मोटारसायकल चालवत जात होते. दरम्यान वानेवाडी शिवारात सतिश सोमाणी यांच्या शेता जवळ आले असता त्यांच्या पाठीमागुन एका मोटारसायकलवर अनोळखी चार व्यक्तींनी येउन संदीप कचरे यांना रस्त्याचे खाली नेउन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन त्यांच्या जवळील रोख रक्कम 32,000/- रु., एक मोबाईल फोन, हातातील घड्याळ व 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण 64,000/- रु. चा माल जबरीने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या संदीप कचरे यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत अनोळखी 4 व्यक्तींविरुध्द गुन्हा दि. 25.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
“ मोटार वाहन कायदा-नियमांचे उल्लंघन 259 कारवाया. ”
उस्मानाबाद जिल्हा: दि. 25/04/2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुध्द मोटार वाहन कायदा-विविध कलम-नियमांनुसार 259 कारवाया केल्या असुन त्यातुन 66,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल करण्यात आले आहे.