अवैध मद्य विक्री विरुध्द पोलिसांची कारवाई

 

अवैध मद्य विक्री विरुध्द पोलिसांची कारवाई

 उस्मानाबाद :  समाधान अशोक वीर व राम नरसिंग मस्के, दोघे रा. आळणी, ता. उस्मानाबाद हे दोघे दि. 23.06.2020 रोजी मौजे आळणी फाटा ते ढोकी जाणाऱ्या रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 09 एटी 2333 ने दारुची विनापरवाना वाहतुक करत असतांना स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकास आढळले. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून विदेशी दारुच्या 48 बाटल्या (किं.अं. 7,200/-रु.) व वाहतुकीस वापरलेली नमूद मोटारसायकल जप्त केली आहे.

  लोहारा: श्रीनिवास लक्ष्मण बुरावार, रा. जेवळी (उ.), ता. लोहारा हा दि. 23.06.2020 रोजी मौजे जेवळी (उ.) येथील बस थांबा चौकात दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एका पिशवीत 180 मि.ली. विदेशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 1,680/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळला.यावरुन वरील तीघां विरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

“मोटार वाहन कायदा उल्लंघन: 220 कारवायांत 46,000 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी दि. 23/06/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुध्द 220 कारवाया केल्या. त्यातुन 46,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

From around the web