उमरगा : अपघातात दोन जखमी
Sun, 20 Sep 2020
उमरगा: चंद्राथ राम काजळे व मोहन मनोहर हांडे, दोघे रा. कोरेगाव, ता. उमरगा हे दोघे मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 4710 ने दि. 13.09.2020 रोजी 19.00 वा. सु. उमरगा येथील स्मशानभुमीजवळील पुलावरुन जात होते. यावेळी मोहन हांडे यांनी मोटारसायकल निष्काळजीपणे चालवल्याने मो.सा. सह ते दोघे पुलाखाली पडले. या अपघातात मोहन हांडे हे किरकोळ जखमी झाले तर पाठीमागे बसलेले चंद्राथ काजळे यांचा उजवा हात दोन ठिकाणी मोडला आहे. अशा मजकुराच्या चंद्राथ काजळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन मोहन हांडे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अन्वये गुन्हा दि. 19.09.2020 रोजी नोंदवला आहे.