उस्मानाबादेत पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरु
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात नगर परिषदेने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. गेल्या वर्षभरातील ही तिसरी अतिक्रमण हटाव मोहीम आहे.वारंवार अतिक्रमण मोहीम राववूनही पुन्हा जैसे थे परिस्थिती होत आहे.
उस्मानाबाद शहरातील बस स्थानकासमोर पुन्हा एकदा अतिक्रमण धारकांनी आपले बस्तान वसविले होते. शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच अनेक महत्वाच्या चौकात पान टपऱ्या , हॉटेल्स, फळविक्रेते, वडा पाव सेंटर यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळा येत होता.
उस्मानाबाद शहरातील मुख्य बस स्थानकापासून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , बार्शी नाका, तुळजापूर रोड आणि सांजा मार्गावर गेल्या वर्षभरात उस्मानाबाद नगरपालिकेने तीन वेळा अतिक्रमण मोहीम राबवली.तरीही पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली होती.
या अतिक्रमण धारकावर पुन्हा एकदा नगर परिषदेने बुलडोझर फिरवला आहे. गेल्या दोन दिवसात किमान दोनशे ते तीनशे अतिक्रमण हटवण्यात आली आहेत. उस्मानाबाद शहराच्या मुख्य महामार्गावरील अतिक्रमण हटवल्याने शहरातील रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानंतर नगर परिषदेला जाग आली असून, पुन्हा एकदा अतिक्रमण हटविले जात आहे. मात्र येत्या काही दिवसात पुन्हा अतिक्रमण धारकांनी ठाण मांडल्यास त्यावर कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
Video