अवैध बांधकाम प्रकरणी उस्मानाबाद नगरपरिषदेतर्फे दोघांवर गुन्हे दाखल

 
अवैध बांधकाम प्रकरणी उस्मानाबाद नगरपरिषदेतर्फे दोघांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद : अवैध बांधकाम प्रकरणी उस्मानाबाद नगरपरिषदेतर्फे दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात अनेक ठिकाणी अवैध बांधकाम असताना केवळ तोंड बघून कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. 


उस्मानाबाद नगरपरिषद हद्दीत आदर्शनगर येथे शिवदास भोसले यांनी तर जिजाऊनगर येथे कमल शेगर यांनी नगरपरिषदेने दिलेल्या विकास परवानगीचे उल्लंघन करुन बांधकामे केली होती. ही अवैध बांधकामे एका महिन्याच्या आत काढून टाकावी किंवा तसे सविस्तर स्पष्टीकरण नगरपरिषदेस द्यावे अशी लेखी सूचना संबंधीतांना महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यांतर्गत यापुर्वीच नगरपरिषदेने दिली असतांनाही त्या दोघांनी तशी कृती केली नाही. यावरुन नगरपरिषदेचे क्षेत्रीय अधिकारी- श्री सुनिल कांबळे यांनी 20 जानेवारी रोजी दिलेल्या 2 स्वतंत्र प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा कलम- 53 (1) अंतर्गत 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

From around the web