मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळेवर खंडणीचा गुन्हा दाखल

 
 मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळेवर खंडणीचा गुन्हा दाखल

उस्मानाबाद - एक लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दादासाहेब कोरके, रा. समता वसाहत, उस्मानाबाद हे शहरातील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये  व्यवस्थापक आहेत. इंदीरानगर, उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेले महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे जिल्हा सचिव- श्री. दादा कांबळे यांनी  दि. 17.09.2020 रोजी 14.30 वा. सु. शहरातील जॉनी हॉटेल जवळ दादासाहेब कोरके यांना फोन करुन बोलावून घेतले. 

दादासाहेब कोरके तेथे गेले असता दादा कांबळे याने, “तु आम्हाला 1 लाख रुपये दे अन्यथा सह्याद्रीहॉस्पिटची  मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलन करु, ही गोष्ट बाहेर कोणास सांगितली तर बघ.” अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या दादासाहेब कोकरे यांनी दि. 19.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 385 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


गोर गरीब लोकांची सह्याद्री हॉस्पिटल लुटमार करीत करीत आहे,  त्यामुळे आवाज उठवला तर माझ्याविरुद्ध एक लाखाची खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल केला,  माझा व जनतेचा आवाज दडविण्याचा प्रयत्न चालू आहे . या दडपशाहीला बळी न पडता मी मागे  हाटणार नाही लुटमारी विरुद्ध लढा देणार

- दादा कांबळे, जिल्हा सचिव, मनसे


                                                                                    

From around the web