पालकमंत्र्याविरुद्ध पोस्टरबाजी : मनसेचे दादा कांबळेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 
पालकमंत्र्याविरुद्ध पोस्टरबाजी :  मनसेचे दादा कांबळेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


उस्मानाबाद -  उस्मानाबाद शहरात पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध पोस्टरबाजी करणारे  मनसेचे जिल्हा  सचिव दादा कांबळे यांच्यासह पाच जणांविरुद्ध  मनाई आदेश झुगारुन  आंदोलन केले म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- आपत्ती व्यवथापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या आदेशाने उस्मानाबाद शहरात / जिल्ह्यात विविध मनाई आदेश अंमलात आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द खालील गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.त्यात मनसेच्या पाच कार्यकर्त्याचा समावेश आहे. 


 दादा गुणवंत कांबळे, रा. उस्मानाबाद व अन्य चौघे इसम यांनी दि. 15.07.2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रस्त्याच्या दुभाजकात असणाऱ्या पथ दिव्यांच्या खांबांवर पालकमंत्री गडप- मिसींग अशा मजकुराची पत्रे चिकटवली व हातात घेउन मिरवली. असे करतांना त्यांनी संचारबंदी, सोशल डीस्टन्सींग, मास्क न घालने अशा विविध मनाई आदेशांचे उल्लंघन करत असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले. 

वरील प्रमाणे मनाई आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सरकार तर्फे देण्यात आलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

From around the web