सहावीत शिकणारी ज्ञानेश्वरी शेतात चक्क ट्रॅक्टर चालवते... (Video)

 
किणीची 'आर्ची' वडिलांना करते शेतीकामात मदत !

सहावीत शिकणारी ज्ञानेश्वरी शेतात चक्क ट्रॅक्टर चालवते... (Video)


उस्मानाबाद - एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे मजुरांची चणचण, त्यावर उपाय म्हणून किणीचे शेतकरी औदूंबर हाजगुडे यांनी आपल्या सहावीत शिकणाऱ्या मुलीला  ट्रॅक्टर  चालवण्यास शिकवले आणि आज ११ वर्षाची  ज्ञानेश्वरी शेतात बिनधास्त  ट्रॅक्टर चालवून नांगरणी करीत आहे. ज्ञानेश्वरीच्या या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील किणीचे शेतकरी औदूंबर हाजगुडे यांना साडेतीन हेक्टर शेती आहे, शेतीकामात मजूर मिळत नसल्याने  २००८ मध्ये त्यांनी स्वतःचे  ट्रॅक्टर  घेतले, पूर्वी ते आणि त्यांची पत्नी शेतात  ट्रॅक्टर  चालवून शेतीची मशागत करीत होते, मात्र चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीच्या  हृदयावर शस्त्रक्रिया झाल्याने त्या  ट्रॅक्टर  चालवत नाहीत,मात्र आपल्या आईचा वारसा आता ज्ञानेश्वरी जोपासत आहे.



सध्या शेतीमध्ये उन्हाळी मशागतीची कामे चालू आहेत. कोरोनाचे संकटामुळे शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत आला आहे. त्यात मजुरांची चणचण भासत आहे. औदूंबर हाजगुडे यांनी घरीच सर्व कामे करून शेती व्यवसाय सांभाळत आहेत. आता या कामात त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी मदत करीत आहे. केवळ ११ व्या  वर्षी ज्ञानेश्वरी  न भिता मोठ्या धाडसाने  ट्रॅक्टर चालवून शेतात नांगरणी करीत आहे. तिला ही प्रेरणा तिच्या आईकडून मिळाली आहे.ज्ञानेश्वरीला किणीची आर्ची म्हणून लोक संबोधु  लागले आहेत.

गेल्या एक शतकात सर्वात मोठे संकट कोरोना विषाणूचे आले आहे. या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. शेतकरीही यात चांगलाच भरडला आहे. औदूंबर हाजगुडे सारखे शेतकरी या संकटावर मात करण्यासाठी ११ वर्षाच्या मुलीची मदत घेत आहेत. ज्ञानेश्वरीच्या धाडसाचे करावे तितके  कौतुक कमी आहे.


पाहा व्हिडीओ 


From around the web