डॉक्टरच्या घरातील १५ लाख रुपये चोरणाऱ्या महिलेस साक्षीदारास अटक

 

चोरीच्या पैश्यातून खरेदी केली मारुती डिझायर कार 

   डॉक्टरच्या घरातील १५ लाख रुपये चोरणाऱ्या महिलेस साक्षीदारास अटक

उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील एका डॉक्टरच्या घरातील १५ लाख रुपये चोरणाऱ्या एका महिलेस पोलिसांनी साक्षीदारास अटक केली आहे. सदर महिला या  डॉक्टरच्या घरी कामास होती. तिने चोरीच्या पैश्यातून  मारुती डिझायर कार खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी चोरीच्या पैश्यातून खरेदी केलेली कार, रोख रक्कम जप्त केले आहेत. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ. आदिनाथ राजगुरु (रा. अक्षय हॉस्पीटल, सांजा रोड, उस्मानाबाद ) यांनी जानेवारी 2020 ते 29.04.2020 या कालावधीत घरातील कपाटात वेळोवेळी ठेवलेली रोख रक्कम दि. 29.04.2020 रोजी हिशोब करतांना 15,00,000/-रु. कमी आढळली होती. यावरुन पो.ठा. आनंदनगर येथे दि. 30.04.2020 रोजी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला होता. 


            गुन्हा तपासात . पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी,. मोतीचंद राठोड व पो.ठा. आनंदनगर चे पो.नि. सतीश चव्हाण यांच्या पथकातील पोहेकॉ- संदीप साबळे, पोकॉ- अशोक ढगारे, विशाल कांबळे, सचिन खंडेराव यांच्या पथकाने गोपनीय माहिती घेतली. यावेळी समजले की, सदर ठिकाणी काम करणारी महिला ही  सुमारे दिड महिन्या पुर्वी अचानकपणे काम सोडून गेली आहे. 

पथकाने त्या महिलेस ताब्यात घेउन सखोल विचारपुस करता त्या महिलेने कबूल केले की, घरकाम करत असतांना वेळोवेळी ड्रावर मधून तिजोरीच्या चाव्या घेउन तिजोरीतील रोख रकमेतील काही रक्कम ती काढून घेत असे. चोरलेले पैसे परिचयातील एका पुरुषाकडे ठेवण्यास दिले आहे. तर 4,90,000/- रु. ची एक मारुती डिझायर कार खरेदी केली आहे. यावर पथकाने त्या पुरुषासही ताब्यात घेतले व त्या दोघांच्या ताब्यातून 10,00,000/- रु. रोख रक्कम व खरेदी केलेली कार असा एकुण 14,90,000/-रु. चा माल जप्त केला आहे. पथकाच्या या कामगीरीबद्दल पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन व  अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


From around the web