उस्मानाबाद 58 पैकी 55 निगेटीव्ह ३ प्रलंबित

 

उस्मानाबाद 58 पैकी 55 निगेटीव्ह ३ प्रलंबित


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील  ५८ पैकी ५५  लोकांचे स्वॅबचे रिपोर्ट आज  निगेटिव्ह आले असून  ३ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. त्यांचे अहवाल शनिवारी येणार आहेत. दरम्यान, उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात बाथरूममध्ये पडून मयत झालेल्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६२  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले असून पैकी पंधरा  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत ४७  रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासाजनक बातमी अशी की, उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात बाथरूममध्ये पडून मयत झालेल्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 29.05.2020 रोजी  उस्मानाबाद जिल्हयातील 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. 

From around the web