पेट्रोल,डिझेल वर आकारण्यात येणारा कर कमी करायला सांगावा आणि मगच काँग्रेसने आंदोलन करावे

 
 - सतीश दंडनाईक 

 पेट्रोल,डिझेल वर आकारण्यात येणारा कर कमी करायला सांगावा आणि मगच काँग्रेसने आंदोलन करावे


उस्मानाबाद  - महाराष्ट्र काँग्रेसने पहिले राज्य सरकारला पेट्रोल,डिझेल वर आकारण्यात येणारा कर कमी करायला सांगावा आणि मगच आंदोलन करावे, असे प्रति आव्हान संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक सतीश दंडनाईक यांनी दिले आहे. 

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा मूल्यवर्धीत कर ( VAT)  देशात सर्वाधिक आहे.राज्यात पेट्रोलवर    ३८.११ % तर डिझेलवर २१.८९ % व्हॅट आकारला जातो.त्यामुळेच महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा सर्वाधिक झटका बसतो.    राज्याचा सुमारे १४ टक्के    म्हणजे वर्षाला २५००० कोटी रुपये महसूल जवळपास पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करातून येतो.  

पेट्रोल ची मूळ किंमत केवळ  ₹  ३९.२१ प्रति लिटर इतकी आहे त्यावर महाराष्ट्र सरकार प्रति लिटरला  ₹  २५.३० इतका कर आकारते तर डिझेलला प्रति लिटरला  ₹  १७.०५ इतका कर आकारते.   केंद्र सरकार पेट्रोल व डिझेल वर प्रति लिटरला अनुक्रमे  ₹  १९.४८    व  ₹  १५.३३ इतका कर आकारते यातून मिळालेले उत्पन्न    देशातील सर्व राज्यांना विकास कामांसाठी वितरित केले जातो.

राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस हा मुख्य घटक आहे.काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात उद्या आंदोलन पुकारले असल्याची माहिती आहे.आमचं काँग्रेसच्या सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की जर तुम्हाला खरंच जनतेची चाड असेल , तुमच्याकडे थोडी जरी नैतिकता असेल तर तुम्ही राज्य सरकार मध्ये असलेल्या आपल्या नेत्यांना पेट्रोल , डिझेल वर राज्य सरकारकडून आकारला जाणार कर कमी करायला सांगा आणि मगच आंदोलन करा. त्यामुळे आधीच कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगासारखे मोठे खर्च अंगावर असताना ही करकपात करणे राज्याला अजिबात परवडणारं नाही.  

महाराष्ट्र व त्याच्या शेजारील राज्यात पेट्रोल डिझेल वर आकारला जाणाऱ्या व्हॅट चा तुलनात्मक तक्ता


अ.क्रं.
राज्याचे नाव
व्हॅट


पेट्रोल
डिझेल
1
महाराष्ट्र
३८.११%      
२१.८९%
2
कर्नाटक
३०.२८%
२०.२३%     
3
गुजरात
२५.४५%
२५.५५%
4
गोवा
१६.६६%
१८.८८%
5
छत्तीसगड
२६.८७%
२५.७४%

From around the web