प्रतिकात्मक श्रीकृष्णास लोणी खाऊ घालून भाजपाचे दूध आंदोलन ( Video)

 

प्रतिकात्मक श्रीकृष्णास लोणी खाऊ घालून भाजपाचे  दूध आंदोलन ( Video)

उस्मानाबाद -  शेतकऱ्यांना दुधाला कमीत कमी ३० रु. प्रती लिटर भाव मिळावा, प्रती लिटर १० रु. अनुदान द्यावे, दुध भुकटीस प्रती किलोस ५०रु. अनुदान द्यावे. या मागणीसाठी भाजपच्या वतीने  वतीने आज आंदोलन करण्यात आले.  आ. राणा जगजितसिंह  पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष  नितीन काळे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.

यावेळी आमदार मा.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना उद्धवस्त केल्याचा आरोप केला, सरकारकडे पुरेसा निधी असतानाही शेतकऱ्यांना केवळ 16-18 रु नीचांकी दर मिळत आहे,  याचा निषेध करून शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 30 रु दर मिळायलाच हवा अशी आग्रही मागणी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी भाजपा रासप रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम यांच्यावतीने जिल्हाभरात दुध आंदोलन करत असल्याचे सांगून भाजपा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यासोबत आहे अशी ग्वाही दिली.

प्रतिकात्मक श्रीकृष्णास लोणी खाऊ घालून भाजपाचे  दूध आंदोलन ( Video)


यावेळी आ. राणा जगजितसिंह पाटील व नितीन काळे यांनी दही घुसळून निघालेले लोणी प्रतिकात्मक श्रीकृष्णास खाऊ घातले व या श्रीकृष्णाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी द्यावी,व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. महाभारतात उद्धव हे श्रीकृष्णाचे मित्र तत्वज्ञ होते,श्रीकृष्णाने उद्धवास जनतेच्या प्रति त्याग व परिश्रमाचे धडे दिले,त्याग व परिश्रमाचा अभाव लोकप्रतिनिधीच्या ज्ञानाला संकुचित ठेवतो,श्रीकृष्णाने जनहितासाठी उद्धवाना मौलिक मार्गदर्शन केले होते तसेच मार्गदर्शन भगवान श्रीकृष्णाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करावे व त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
येडशी टोलनाक्यावर रास्ता रोको 


प्रतिकात्मक श्रीकृष्णास लोणी खाऊ घालून भाजपाचे  दूध आंदोलन ( Video)


दूध दरवाढीच्या मागणीसाठी येडशी टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,  भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड.   खंडेराव चौरे,नेताजी पाटील,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे,राजसिंह राजेनिंबाळकर, प्रभारी इंद्रजित देवकते,तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील,माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, ऍड. नितीन भोसले,संदीप कोकाटे,डॉ. गोविंद कोकाटे,राहुल काकडे, प्रवीण पाठक,शिवसंग्रामचे श्रीकांत भुतेकर,गणेश मोरे,पुजा देडे,नगरसेवक योगेश जाधव, बालाजी कोरे,दाजीप्पा पवार,विनायक कुलकर्णी,ओम नाईकवाडी,अरुण पापा वीर,गजानन नलावडे,अनंत देशमुख, व्यंकट पाटील,नाना बोदर,धत्तुरे नाना,सुजित साळुंके,गणेश इंगळगी,श्रीराम मुंबरे,अक्षय भालेराव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते


From around the web