फक्त शहराचे नाव धाराशिव...  तालुका आणि जिल्ह्याचे नाव उस्मानाबाद ... 

तालुका आणि जिल्ह्याच्या नामांतरास हरकत घेणारी याचिका कोर्टाने  फेटाळली 

 
dd

मुंबई -  राज्य सरकराने उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव केले आहे. तालुका आणि जिल्ह्याचे नामांतर अद्याप केले नसल्याने तालुका आणि जिल्हा   नामांतरास हरकत घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शहराच्या नामांतरबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी येत्या  ४ ऑक्टोबरला होणार आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या नेतुत्वाखालील महाविकास आघाडी सरकराने जाता -  जाता उस्मानाबादचे  नामांतर  धाराशिव केले होते. मात्र शिंदे - फडणवीस सरकारने त्यास स्थगिती देऊन नंतर हाच ठराव मंजूर केला होता  , त्यानंतर केंद्र सरकराने त्यास मंजुरी दिली होती. केंद्र सरकारने नोटिफिकेन्स काढताच त्यास हरकत घेण्यात आली होती. 

 तालुका आणि जिल्ह्याच्या नामांतरास हरकत घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयात  जिल्हा आणि तालुका पातळीवर कोणताही बदल झाला नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे आव्हान देणाऱ्या याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. याचिकांच्या वैधतेवर सरकारने जोरदार आक्षेप नोंदवला होता. यानंतर महसूल आणि जिल्हा पातळीवरच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढल्या.

जेव्हा शासन आदेश निघेल त्यावेळी याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. तसेच तूर्तास तालुका आणि जिल्हा पातळीवर नवीन नावे वापरणार नाही अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयात हमी दिली आहे. आता उस्मानाबाद शहराच्या नामांतराला आव्हान देणार्‍या याचिकांवर ४ ऑक्टोबरला  सुनावणी होणार आहे.

From around the web